Baramati Byelection Result 2026 : सुनेत्रा पवारांविरोधात लढणाऱ्या करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले पिछाडीवर

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे.

Baramati Byelection Result 2026 : सुनेत्रा पवारांविरोधात लढणाऱ्या करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले पिछाडीवर

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेच्या रिक्त जागेसाठी 23 एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीचा आज निकाल आहे. तसेच भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती. त्याचाही निकाल आज जाहीर होणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सुरुवात राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणूकीत सुनेत्रा पवारांविरोधात 22 उमेदवार रिंगणात होते.

अजित पवार यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांची पकड मजबूत ठेवली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच सुनेत्रा पवारांनी 26 हजार 773 मतांची मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात उतरलेल्या 22 उमेदवारांमध्ये करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकलेसुद्धा होते. सुनेत्रा पवार यांनी प्रतिस्पर्ध्यांना मोठी धूळ चारली आहे. पहिल्या फेरीअखेर त्या 6,500 मतांनी आघाडीवर होत्या, तर दुसऱ्या फेरीचा निकाल हाती येताच ही आघाडी थेट 36591 मतांपर्यंत पोहोचली आहे. सुनेत्रा पवारांसमोर सक्षम आणि ताकदवान उमेदवाराचे आव्हान नसल्याने, ही निवडणूक केवळ औपचारिकताच उरली आहे की काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हेही वाचा- Baramati Rahuri Bypolls Election Results: अजितदादा गेले पण जादू कायम, बारामतीकरांचा सुनेत्रा वहिनींना 'फुल्ल सपोर्ट', चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर

बारामती पोटनिवडणूक पहिल्या ते तिसऱ्या फेरीत कोणाला किती मतं?
सुनेत्रा पवार : 26773 मतं
करुणा धनंजय मुंडे : 33 मतं
डॉ. अभिजित वामनराव बिचुकले : 19 मतं
नोटा : 88

बारामतीच्या या निकालाला केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक परिमाणही लाभले आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण मतदारसंघात निर्माण झालेली सहानुभूतीची लाट मतपेटीतून स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. बारामतीतील पवारांचे पारंपरिक राजकीय वर्चस्व आणि दादांनी गेल्या अनेक वर्षांत केलेल्या विकासकामांची पावती मतदार आज सुनेत्रा पवारांच्या पारड्यात मते टाकून देत आहेत. निकालाच्या या पार्श्वभूमीवर, "मतदारांचा आशीर्वाद" सुनेत्रा पवारांच्या पाठीशी असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number