‘या’ ठिकाणी होणार युगेंद्र पवारांचा साखरपुडा; पवार कुटुंब पुन्हा एकत्र दिसणार

जय अजित पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यानंतर आता शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा 3 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणार आहे.

‘या’ ठिकाणी होणार युगेंद्र पवारांचा साखरपुडा; पवार कुटुंब पुन्हा एकत्र दिसणार

मुंबई: यंदा हा वर्ष पवार कुटुंबीयांसाठी आनंदाचा वर्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी पवार कुटुंबात एक नसून दोन लग्न होणार आहेत. जय अजित पवार यांच्या साखरपुडा सोहळ्यानंतर आता शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा साखरपुडा 3 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत होणार आहे. यासह, मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या इंडिया बुल्स बिल्डिंग याठिकाणी युगेंद्र पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न होईल. ज्येष्ठ नेते आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्य युगेंद्र पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांच्या साखरपुड्यात उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: ‘कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या’;अजित दादांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

कोण आहे युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आणि शरद पवार यांचे नातू आहेत. युगेंद्र यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात बारामती मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. यासह, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी काकू सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच, युगेंद्र यांचा तनिष्कासोबत साखरपुडा होणार असल्याने, पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number