Arjun Tendulkar Wedding: तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; ‘या’ दिवशी अर्जुन तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात

विशेष म्हणजे, खुद्द 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनेच या वृत्ताला दुजोरा दिल्याने तेंडुलकर कुटुंबियांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.<br/>
Arjun Tendulkar Wedding: तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; ‘या’ दिवशी अर्जुन तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात

Arjun Tendulkar Wedding Date: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे. सचिनचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर हा मार्च महिन्यात आपली मंगेतर सानिया चांडोक हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे, खुद्द 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरनेच या वृत्ताला दुजोरा दिल्याने तेंडुलकर कुटुंबियांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा – PV Sindhu: दुखापतीवर मात करत पीव्ही सिंधूची विजयी सलामी; मलेशिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

मार्चमध्ये पार पडणार विवाह सोहळा

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाचे विधी 3 मार्च पासून सुरू होणार असून, 5 मार्च 2026 रोजी मुख्य विवाह सोहळा संपन्न होईल. ऑगस्ट 2025 मध्ये या दोघांनी अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा करून लग्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. सानिया चांडोक ही एक यशस्वी उद्योजक असून ती मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून तेंडुलकर कुटुंबाच्या जवळ असल्याची माहिती आहे.

स्वतः सचिनने चाहत्याला दिले उत्तर

या लग्नाबाबतच्या चर्चांना तेव्हा अधिकृत पूर्णविराम मिळाला, जेव्हा सचिन तेंडुलकरने एका Reddit AMA (आस्क मी एनीथिंग) सत्रादरम्यान चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. अर्जुन खरोखरच लग्न करत आहे का? या प्रश्नावर सचिनने उत्तर दिले की, 'हो, तो लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे आणि त्याच्या आयुष्यातील या नवीन टप्प्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत.' सचिनच्या या उत्तरामुळे या हाय-प्रोफाईल लग्नावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: दुहेरी जबाबदारी…दुहेरी धमाका ! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीने दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

आयपीएल 2026 आणि नवी सुरुवात

अर्जुन तेंडुलकरसाठी हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाने खरेदी केले आहे. आयपीएलची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अर्जुन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. हा विवाह सोहळा मुंबईतच पार पडणार असून, तो अत्यंत खाजगी स्वरूपाचा असेल. यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि क्रिकेट विश्वातील काही मोजकीच मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version