Shivsena Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेसेनेकडून वेग! 40 मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती; कोणत्या नेत्याला कुठली जबाबदारी

आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 पैकी तब्बल 40 लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसेना ठाकरे गटाने संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे.

Shivsena Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेसेनेकडून वेग! 40 मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती; कोणत्या नेत्याला कुठली जबाबदारी

शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यभरातील लोकसभा मतदार संघानिहाय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील 48 पैकी तब्बल 40 लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाने संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे. रायगड लोकसभा मतदार संघासाठी संजय मानाजी कदम यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख असलेल्या संजय कदम यांच्यावर यापूर्वी काही वर्षे दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती. विधान सभा निवडणूक काळात त्यांनी पक्षासाठी केलेले काम विशेष उल्लेखनीय ठरले होते. यावेळी अनेक तरुण चेहऱ्यांना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा- Gokul Milk Union Election Kolhapur: गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल! 18 ऑक्टोबरला मतदान, सतेज पाटील विरुद्ध महायुतीची थेट लढत

मात्र जालना, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड, यवतमाळ-वाशिम, वर्धा, नागपूर, रामटेक, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांसाठीही संपर्कप्रमुख निश्चित करण्यात आले आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक बांधणीला वेग दिल्याचे पाहायला मिळत आहे. 

लोकसभा संपर्कप्रमुख 
कल्याण-भिवंडी : वरुण सरदेसाई
शिर्डी-अहिल्यानगर : सुनील शिंदे  
सातारा-सांगली : नितीन बानुगडे-पाटील
छत्रपती संभाजीनगर : आशीष चेंबुरकर
शिरूर : किरण तावडे
पुणे : सचिन पडवळ

मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुख
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : प्रदीप बोरिकर
रायगड : संजय मानाजी कदम
मावळ : प्रसाद भोईर
पालघर : विलास पोतनीस
सातारा : उदय ढळवी
सांगली : स्वप्नील कुंजीर 
हातकणंगले : महेंद्र इंदुलकर

कोणत्या नेत्यांना संधी
सोलापूर-माढा : सुषमा अंधारे
नाशिक-दिंडोरी : रविंद्र मिर्लेकर
बुलढाणा : नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर
अकोला : नितीन देशमुख आणि नीलेश घुमाळ
अमरावती : नितीन देशमुख आणि डॉ. किशोर ठाकरे
हिंगोली : बबनराव थोरात
कोल्हापूर : अरुण दुधवडकर
बारामती : संजय सावंत
धुळे : अशोक धात्रक
रावेर : गुलाबराव वाघ
नंदुरबार : मुकेश साळुंके 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number