Anjali Damania criticizes PM Modi : अंजली दमानिया यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचे विमानप्रवास, दौरे, रॅली आणि ताफे यांच्यावर जोरदार टीका केली. “तुमच्या पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आज मोठ्या प्रमाणावर विमानाने प्रवास करत आहेत. रॅलीज करत आहे. गाड्यांचे ताफे मिरवत आहेत आणि तुम्ही सामान्य लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायला सांगत आहात. सामान्य माणसासाठी वेगळे नियम आणि वेगळा न्याय आहे का? हेच काय ते तुमचे यश आहे का?” असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला.
‘साहेब आपण जे बोलतो, ते आपणही करायला हवं,’ असं म्हणत दमानिया यांनी जोरदार टीका केली. ‘ते आणि त्यांचा पक्ष काय करत आहेत, याचा त्यांनी काहीच विचार करू नये? त्यांनी देशात तीन ठिकाणी दौरे केले. रॅलीज काढल्या. आता येत्या काळात परदेश दौऱ्यांसाठीही जाणार आहेत. त्यांनी आपण जे बोलतो, ते स्वतः करायला नको का,’ असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.