Anil Kapoor Post : दुसऱ्यांदा आजोबा होताच अनिल कपूर यांच्या आनंदाला नाही राहिला पारावर, भावनिक पोस्ट करत व्यक्त केला आनंद

सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर आहुजा आणि कपूर कुटुंबियांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. सर्वजण नव्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाने खूश झाले आहेत.
Anil Kapoor Post : दुसऱ्यांदा आजोबा होताच अनिल कपूर यांच्या आनंदाला नाही राहिला पारावर, भावनिक पोस्ट करत व्यक्त केला आनंद

Anil Kapoor Post for New Grandson : बॉलीवूडचे ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची कन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली असून, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 29 मार्च, 2026 रोजी सोनम आणि आनंद आहुजा यांच्या आयुष्यात या दुसऱ्या पाहुण्याचे आगमन झाले. या बातमीनंतर अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या नातवाचे स्वागत केले आहे. ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून नेटकऱ्यांकडून कपूर आणि आहुजा कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अनिल कपूर यांची ‘इमोशनल’ पोस्ट
भारतातील दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट करून दिली आहे. “माझे हृदय आणखी विशाल झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “या जगात तुझे स्वागत आहे माझ्या चिमुकल्या, तुझ्यावर आधीच खूप प्रेम केले जात आहे. वायू, आता तू मोठा भाऊ झाला आहेस आणि मला खात्री आहे की तू ही जबाबदारी उत्तम पार पाडशील.” सोनम आणि आनंदचे आभार मानत अनिल कपूर यांनी स्वतःला एक ‘प्रॉड नानाने’ (आजोबा) संबोधले आहे.

हेही वाचा – Sonam Kapoor Good News : सोनम कपूर दुसऱ्यांदा झाली आई! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली ‘गूड न्यूज’

सोनम कपूरची दुसरी ‘प्रेग्नन्सी’ आणि कारकीर्द
सोनम कपूरने काही काळापूर्वी ‘प्रिन्सेस डायना’ यांच्या शैलीतील ‘हॉट-पिंक’ ड्रेसमध्ये फोटो शेअर करून आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. तिने 2007 मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर ‘रांझणा’, ‘नीरजा’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या अनेक यशस्वी चित्रपटांत तिने काम केले. ती शेवटची 2023 मध्ये ‘ब्लाईंड’ या चित्रपटात दिसली होती. आता दुसऱ्या बाळाच्या आगमनानंतर ती पुन्हा एकदा मातृत्वाचा आनंद घेत आहे.

पती आनंद आहुजासह कौटुंबिक आनंद
सोनम कपूर आणि तिचे पती आनंद आहुजा यांचे वास्तव्य अनेकदा लंडन (यूके) मध्ये असते. त्यांच्या पहिल्या मुलाचे, वायूचे नावही खूप चर्चेत राहिले होते. आता दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आहुजा आणि कपूर कुटुंबियांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. आनंद आहुजा यांनीही सोशल मीडियावर ही आनंदाची वार्ता शेअर केली असून, जगभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. वायू आता मोठा भाऊ झाल्याने या भावंडांची जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

हेही वाचा – Dhurandhar 2′ च्या यशानंतर आदित्य धर- यामी गौतम बनलेत ‘पॉवर कपल’; पण आदित्यचे स्वप्न दिग्दर्शक बनण्याचे नसून हे होते

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version