Dhule Breaking : अविवाहित असून सहा महिन्यांची गरोदर, भीतीपोटी केलं असं काही अन् थेट जीवावर बेतलं

धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावात एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Dhule Breaking : अविवाहित असून सहा महिन्यांची गरोदर, भीतीपोटी केलं असं काही अन् थेट जीवावर बेतलं

धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावात एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसांत नोंद केली आहे. मृत तरुणी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. एका 18 वर्षीय मुलीस देवपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

डॉक्टरांनी तपासल्यावर मुलगी गरोदर असल्याचे समजले. शिवाय 24 आठवड्यांचा गर्भ असताना तिने गर्भपातासाठी काहीतरी सेवन केले होते, अशी माहिती डॉक्टरांनी तपासणीनंतर कुटुंबीयांना दिली. अधिक प्रमाणात औषधाने तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला हिरे रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number