‘… तर अजित पवार आज जिवंत असते’, मिटकरींचा दादांच्या ‘त्या’ खास माणसावर निशाणा

विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात अजित पवारांच्या विमान अपघातावर अद्याप चर्चा का होत नाही, यावरून मिटकरींनी तीव्र खंत व्यक्त केली. तसेच, त्यांनी रोहित पवार यांच्या प्रयत्नांचेही स्वागत केले.
‘… तर अजित पवार आज जिवंत असते’, मिटकरींचा दादांच्या ‘त्या’ खास माणसावर निशाणा

Amol Mitkari on Ajit Pawar’s Security Before Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाचे माजी पीआर मॅनेजर नरेश अरोरा यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत विचारले आहे की, दादांच्या अशा कठीण प्रसंगात त्यांना ‘गुलाबी थीम’ देणारे अरोरा आता कुठे गायब आहेत? विधासभा निवडणुकीत दादांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढणारे अरोरा, अजित दादांच्या निधनानंतर आणि सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीनंतर कुठेच दिसत नसल्यामुळे मिटकरींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अजित पवारांच्या सुरक्षेवर आणि पीआरवर प्रश्नचिन्ह
अमोल मिटकरी यांनी सांगितले की, जर बारामतीच्या एअर स्ट्रीपवर किंवा विमानतळावर योग्य सुरक्षा आणि काळजी घेतली असती, तर आज अजित पवार आपल्यात असते. ज्या पीआर एजन्सीने (नरेश अरोरा) पक्षाला गुलाबी जॅकेट आणि गुलाबी थीम दिली, त्यांनी या अपघातानंतर डीजीसीए (DGCA) किंवा एआयबी (AIB) च्या अहवालावर सोशल मीडिया मोहीम का चालवली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मिटकरींच्या मते, अरोरा यांना केवळ कंत्राटापुरते रस होते आणि आता संकटाच्या काळात ते पक्षासोबत दिसत नाहीत.

सभागृहात चर्चेची मागणी आणि सरकारची भूमिका
विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात अजित पवारांच्या विमान अपघातावर अद्याप चर्चा का होत नाही, यावरून मिटकरींनी तीव्र खंत व्यक्त केली. महाराष्ट्राचा इतका मोठा नेता अपघातात जातो आणि त्यावर साधी चर्चाही होऊ नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत विचारलेले प्रश्न रास्त असल्याचे सांगत, राज शिष्टाचार विभागानेही या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती का दिली नाही, यावर त्यांनी बोट ठेवले आहे. शशिकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही चर्चेचा विषय कामकाज पत्रिकेवरून वगळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Supriya Sule: ‘माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे…’; सुप्रिया सुळे यांनी हात जोडून केली चौकशीची मागणी

पिंकी माळी कुटुंबाला धमक्या आणि मदतीचा अभाव
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळीच्या कुटुंबाला VSR व्हेंचर कंपनीच्या मालकाकडून धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा अमोल मिटकरींनी केला आहे. कंपनीचा मालक मदत करण्याऐवजी कुटुंबाला धमकावत असून, या प्रकरणाची गृहखात्याने गांभीर्याने दखल घेऊन कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी सभागृहात मदतीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कुटुंबापर्यंत मदत पोहोचलेली नसल्याचे पिंकी माळीच्या वडिलांनी सांगितल्याचे मिटकरींनी नमूद केले.

रोहित पवारांचा दिल्लीतील पाठपुरावा
दुसरीकडे, आमदार रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी लोकसभेत आणि राज्यसभेत व्हावी यासाठी दिल्लीत प्रयत्न करत आहेत. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर खासदारांची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती केली आहे. मिटकरींनी रोहित पवारांच्या या प्रयत्नांचे स्वागत केले असून, महाराष्ट्रात आम्ही विधान परिषद आणि विधानसभेत ही लढाई चालूच ठेवणार असल्याचे सांगितले. एआयबीचा (AIB) 23 पानांचा अहवाल कसा चुकीचा आहे, हे मांडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते पीआर मॅनेजर आज गायब असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

हेही वाचा – Raghav Chaddha: ‘ग्राहकांवर होणारी मनमानी आणि आर्थिक फसवणूक…; राघव चड्ढा यांचा संसदेत मोबाईल कंपन्यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version