राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावर सभागृहात अद्यापही चर्चा करण्यात आलेली नाही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत अमोल मिटकरी यांनी दादा सत्तेतील उपमुख्यमंत्री होते त्याच्या शोकसभेनंतर चर्चा होणे अपेक्षित होते मात्र चर्चा झाली नाही, हे अजितदादांच दुर्दैव असल्याचं म्हटलं आहे. तसच जर अधिवेशनात चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा- Shinde-Thackeray Shiv Sena Yuti : मोठी अपडेट समोर! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चांना बळ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा विषय धरून ठेवला आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ते विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना तो अधिकार आहे… दादांच्या विषयाला न्याय द्यायचा असेल तर सर्वांनी एकत्र यावे… DGC ला कोण वाचवत आहे.. यावर सभेत परिषद चर्चा होणे गरजेचे आहे… अधिवेशनात चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल…अदृश्य शक्ती ह्या मागे असेल असे दिसते चर्चा च होत नाहीये…दोनदा निवेदन देऊनही CBI चौकशी होत नसेल तर ही बाबा गंभीर आहे.. तुमचा नेता गेला असता तर तुम्हाला समजेल, दादा निघताना विमानतळ सीसीटीव्ह दाखवा… सभागृहात दादांच्या संदर्भात शंका उपस्थित होते, बोलले पाहिजे… FIR थांबवली मात्र अजूनही पोलिसांवर कारवाई नाही.. खूप लेट झाले आहे.. सरकारला विनंती आहे चर्चा झाली पाहिजे… राजकीय झालर असल्याची शंका येतेय… सभापतीच्या परवानगी शिवाय आम्हाला बोलाता येत नाही… अधिवेशन सुरू झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी चर्चा होणे अपेक्षित होते… मात्र आता सोमवारी चर्चा लावली त्यावेळी चर्चेत किती लोक उपस्थित असणार, ज्यांना दादांविषयी प्रेम आहे ते बोलतील बाकीचे कसे बोलणार… चर्चा दुपारच्या सत्रात लावली पाहिजे त्या चर्चेला मुख्यमंत्री उपस्थित असले पाहिजे… एक दिवस महाराष्ट्राची माती विचारेल अजित पवार यांच्या अपघाताबाबत एक शब्द अधिवेशनात निघत नाही…
पुढे जय पवार यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना मिटकरी म्हणाले की, “आज दादांच्या आईचा वाढदिवस आहे पाडव्याला ते परिवारासोबत असायचे… सर्व माहिती घेऊनच ते पत्रकार परिषद घेतील… पुढच्या आठवड्यात ते पत्रकार परिषद घेतील…”