Ambadas Danve : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार?; अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

कोणत्याही खासदाराची किंवा नेत्याची गळती होणार नाही, असा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. तसेच, शक्तीपीठ महामार्गावरून युती सरकारवर गंभीर आरोपही केले.
Ambadas Danve : उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार?; अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

Uddhav Thackeray MLC Elections : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेची सुरुवात परभणी जिल्ह्यापासून झाली असून, येत्या 1 ते 2 महिन्यांत दर आठवड्याला 2 जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे. परभणीच्या बैठकीत जिल्हा परिषद सर्कल स्तरापर्यंतचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार संजय जाधव यांच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की, ते काही कारणाने येऊ शकले नाहीत; मात्र, ते पक्षासोबतच आहेत. कोणत्याही खासदाराची किंवा नेत्याची गळती होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, शिवसेनेची संघटना सध्या एकसंघ असून ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी पक्षातील फाटाफुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

विधान परिषदेची निवडणूक आणि उमेदवारी
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार ठरवले जातील, असे दानवे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक लढवावी, अशी पक्षातल्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. जर उद्धव ठाकरे यांनी लढण्यास नकार दिला, तर अंबादास दानवे उमेदवार असतील का? या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया देत पक्षप्रमुखांच्या उमेदवारीवरच भर दिला. दुसरीकडे, एकनाथ शिंदे गटामध्ये जागावाटपावरून अस्वस्थता असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा – Sanjay Raut : ‘भाजप गुंडांचा पक्ष म्हणणारे राघव चड्ढा..’ संजय राऊतांचा घणाघात; भाजपवर ‘वॉशिंग मशीन’ राजकारण म्हणत डागली तोफ

शक्तीपीठ महामार्गावरून गंभीर आरोप
शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्यावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. महायुती सरकारच्या काळात जे मोठे प्रकल्प राबवले जातात, त्या प्रकल्पांच्या बाजूला अनेक बड्या उद्योगपतींनी, अधिकाऱ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी जमिनी खरेदी केल्या होत्या, असा दावा त्यांनी केला. शक्तीपीठ मार्गाचा नकाशा बदलल्यामुळे या लोकांचे मनसुबे आता फसले आहेत. नवीन प्रकल्प हे केवळ गैरव्यवहार करण्यासाठीच आखले जातात, असा आरोप त्यांनी पुरंदर विमानतळाचे उदाहरण देऊन केला. या प्रकल्पांना लोकांचा कायम विरोध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे-फडणवीस भेटीच्या अफवा
सोशल मीडियावर सध्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्त भेटीच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना कोणालाही गुपचूप भेटण्याची गरज नाही. जर त्यांना भेटायचे असेल तर ते खुलेआम भेटतात. विधीमंडळ अधिवेशनादरम्यान यापूर्वी अशा भेटी झाल्या आहेत, त्यामुळे ट्विटरवर येणाऱ्या अफवांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Sunetra Pawar: सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? पुण्यात झळकलेल्या फलकांमुळे एकच खळबळ 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version