बच्चू कडू यांनी आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे”.
यावरून आंबादास दानवे यांनीदेखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, बच्चू कडू आता शिंदे यांच्या गटात गेले आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी येऊ दे हे जर सांगायचं असेल तर त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं पाहिजे, शिंदे साहेब देवेंद्रजी यांना सांगतील त्यात विठ्ठलाकडे जायची काय गरज आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.