Akola Municipal Corporation: अकोल्याचा ‘सत्तेचा सस्पेन्स’ अमरावतीत संपणार; भाजपचं ‘मिशन 44’ यशस्वी होणार का?

अकोला महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. अकोल्याच्या राजकीय पटलावरील सर्वात मोठी आणि महत्त्वाची घडामोड आज अमरावतीमध्ये रंगणार आहे.

Akola Municipal Corporation: अकोल्याचा ‘सत्तेचा सस्पेन्स’ अमरावतीत संपणार; भाजपचं ‘मिशन 44’ यशस्वी होणार का?

अकोला: अकोला महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. अकोल्याच्या राजकीय पटलावरील सर्वात मोठी  आणि महत्त्वाची घडामोड आज अमरावतीमध्ये रंगणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील ‘शहर सुधार आघाडी’ने बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला असून, आज सकाळी 11 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात या गटाची अधिकृत ‘ओळख परेड’ पार पडणार आहे. या प्रक्रियेनंतर अकोल्याच्या महापौरपदाची खुर्ची कोणाकडे जाणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

80 सदस्यीय अकोला महानगरपालिकेत सत्तेसाठी 41 हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा सुरू आहे. भाजप 38 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी त्यांना तीन सदस्यांची गरज होती. अशातच भाजपने विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात आपल्याकडे 44 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामुळे विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, आजच्या परेडकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Bank strike: आज देशभर बँकांचा संप! चेक क्लिअरन्स, कॅश विड्रॉल आणि बँकिंग सेवा ठप्प, खाजगी बँकांवरही परिणाम होणार?

भाजपची ‘शहर सुधार आघाडी’ आणि सत्तेचे गणित

भाजपने स्थापन केलेल्या ‘शहर सुधार आघाडी’मध्ये स्वपक्षाचे 38, शरद पवार गटाचे तीन, शिंदे शिवसेनेचा एक, अजित पवार गटाचा एक आणि एक अपक्ष अशा एकूण 44 नगरसेवकांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पवन महल्ले यांची या गटाचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. जर हे 44 नगरसेवक आज विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्ष हजर राहिले, तर अकोला महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणे निश्चित मानले जात आहे.

विरोधकांची ‘फिल्डिंग’ आणि मनधरणीचे प्रयत्न

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेस (21), ठाकरे गट (6), वंचित (5) आणि एमआयएम (3) यांनी एकत्र येत भाजपच्या दाव्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेषतः भाजपच्या गोटात गेलेले शरद पवार गटाचे तीन नगरसेवक, शिंदे आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी एक आणि अपक्ष चांद चौधरी यांची मनधरणी करण्यासाठी विरोधकांकडून गेले दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू होते. या सहा नगरसेवकांपैकी कोणीही भाजपसोबत जाऊ नये, यासाठी निकराचे प्रयत्न केले जात आहेत.

निकालाची प्रतीक्षा

आजच्या ओळख परेडमध्ये भाजप खरोखरच 44 नगरसेवक सादर करण्यात यशस्वी होतो की विरोधक भाजपच्या ताफ्यातून काही नगरसेवक फोडण्यात यशस्वी होतात, यावर अकोल्याचे आगामी सत्ता समीकरण अवलंबून आहे. अकोल्याच्या राजकारणातील ‘किंगमेकर’ ठरलेले हे 6 नगरसेवक आज कोणाची साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आज दुपारपर्यंत अकोल्याच्या सत्तेचा सस्पेन्स संपण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Amazon कडून मोठा निर्णय!16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता, भारतातील टीम्सना बसणार फटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number