Indapur Dance Video : अजितदादांना श्रद्धांजली अन् त्याच व्यासपीठावर नगराध्यक्षांनी ‘माजी म्हणू का’ गाण्यावर धरला ठेका; Video Viral 

इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काही वेळातच गाण्यांवर डान्स सुरू झाल्याची धक्कादायक घटना समोर

Indapur Dance Video : अजितदादांना श्रद्धांजली अन् त्याच व्यासपीठावर नगराध्यक्षांनी ‘माजी म्हणू का’ गाण्यावर धरला ठेका; Video Viral 

इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काही वेळातच गाण्यांवर डान्स सुरू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील दहीहंडी कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दोन वेगवेगळी दृश्ये पाहायला मिळाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, उपस्थितांनी मोबाईलचे टॉर्च लावून श्रद्धांजली दिली. मात्र, काही मिनिटांतच मंत्री निघून गेल्यानंतर याच व्यासपीठावर नगराध्यक्ष भरत शहा, त्यांचे बंधू मुकुंद शहा आणि कार्यकर्त्यांनी " माजी म्हणू का या गाण्यावर "  नृत्य करत जल्लोष केला.

हेही वाचा- Sanjay Dutt: मराठीवरील वक्तव्याने वाद वाढला; संजय दत्तचा प्रताप सरनाईकांना थेट फोन, म्हणाला ‘चुकीचा संदेश…

श्रद्धांजलीनंतर लगेच झालेल्या या डान्समुळे इंदापूर शहरात नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. ज्या व्यासपीठावरून अत्यंत गंभीर वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याच व्यासपीठावर अवघ्या काही मिनिटांतच डीजेच्या तालावर बेधुंद डान्स सुरू झाला. यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हजारो इंदापूरकरांनी आपले मोबाईल टॉर्च सुरू करून दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान गंभीर आणि दुःखाच्या प्रसंगाचे भान न ठेवता त्याच मंचावर अशा प्रकारे गाणी लावून डान्स केल्यामुळे नेटकऱ्यांनी आयोजकांच्या आणि उपस्थित नेत्यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. हा प्रकार अत्यंत असंवेदनशील आणि दिवंगत नेत्याचा अवमान करणारा असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून उमटत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number