Manoj Jarange On Chhagan Bhujbal: "त्यांची उतरती कळा लागलीय, ओबीसी महामंडळ, महाराष्ट्र सदन सगळं खाल्लं.."  मनोज जरांगेंनी भुजबळांना थेट सुनावलं

राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी मराठा उपसमितीच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना चांगलंच सुनावलं आहे.

Manoj Jarange On Chhagan Bhujbal: &quotत्यांची उतरती कळा लागलीय, ओबीसी महामंडळ, महाराष्ट्र सदन सगळं खाल्लं..&quot  मनोज जरांगेंनी भुजबळांना थेट सुनावलं

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिले पाच दिवस त्यांनी पाण्याचा एक थेंबही न घेता उपोषण केलं. आधी हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपला सुरुवात करा, मग उपोषणाचं बघू असं जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी मराठा उपसमितीच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना चांगलंच सुनावलं आहे. यावेळी जरांगेंनी ओबीसी महमंडळ खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही, अशी टीका करत भुजबळांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “जात पडताळणी गरिबांवर दबाव टाकत गरिबांचे वाटोळे करत आहे. थाळा वाजवून साप घरात घेण्यासारखे प्रकार करू नका. बाकीच्या राज्यातील आरक्षण थोड संपलं आहे. मराठा पण दूर जाणार. मराठा पण महायुती पासून दूर जातील. म्हातारा झालं म्हणजे शहाणपण आलं असेल असं वाटत होते. म्हातारपणात देखील त्यांची भूमिका बदलत नाही. तुम्ही तुमचं बघा आणि तुमचं चालू द्या. तुम्ही मराठ्यांच्या लेकरांवर का जळता? ओबीसी महामंडळ खाऊन टाकलं, महाराष्ट्र सदन खाल्लं. आता ओबीसींनी यांना ओळखलं आहे. तुम्हाला स्वतःची राजकिय पोळी भाजून घ्यायची असेल.”  

हेही वाचा- मराठा आंदोलनासाठी निघालेल्या तरुणांचा भीषण अपघात! गेवराईतील 36 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

“तुम्ही लढवर तंगड्या करून योगा करा, तुम्हाला म्हातारपणात काहीही सुचत नाही, तुम्ही म्हटल्यानंतर ओबीसी धोक्यात येतात काय, एखाद्यावेळी धनगरांना ST तन आरक्षण द्यायला पाहिजे. दुसऱ्यांच्या मराठ्यांच्या लेकरांवर तुम्ही का जळता. या वयात सोयीस्कर कसं जगता येईल हे बघा तुम्ही, तुम्ही वेळेवर कसं अजित पवार आणि फडणवीस यांचे होता हे आता सगळ्यांना माहिती आहे. पाहिजे आम्हाला सगळं आरक्षण तुमचं काय म्हणणं आहे. आम्हाला फक्त 10 टक्के आरक्षण आहे हे आरक्षण 55 टक्के समाजाला कुठे पुरेल का? तुमच्या आता दाड पडल्या आहेत.”

“अक्कल दाड पडली की पुन्हा उगवत नाही का? यापुढे त्यांना किंमत देणार नाही. त्यांना आता ओबीसींच्या नावावर काही मिळवून घ्यायच असेल, हा प्राणी आता थोड्या दिवसांचा आहे. यांची आता उतरती कळा लागली आहे. सगळे डाव होतात. महायुतीच्या मागे तुमच्या एकट्याच मतदान आहे का? जितकी जितनी संख्या भारी उतनी उनकी मजा भारी… आपण आता यांना महत्व कमी दिलेलं बरं यांना जुनाच भारा बांधण्याची सवय आहे यांना आता नवीन नको.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number