Ajit Pawar : "…म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे" महायुती केंद्रात आणि राज्यात एकत्र, मात्र महानगपालिका निवडणुकांसाठी युतीत फुट का?; अजित पवारांच थेट स्पष्टीकरण

पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य महानगर पालिकांच्या निवडणुकीत महायुती एकत्र नसण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

Ajit Pawar : &quot…म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे&quot महायुती केंद्रात आणि राज्यात एकत्र, मात्र महानगपालिका निवडणुकांसाठी युतीत फुट का?; अजित पवारांच थेट स्पष्टीकरण

राज्यात सर्वत्र बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत बृहन्मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला कालपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील आपापसात सुरु असलेलं राजकारण चांगलचं चर्चेत आलं आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना जी महायुती एकत्र दिसून होती, ती महायुती महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आमनेसामने असल्याचं पाहायला मिळत आहेत. यामुळे महायुतीतल नाराजीनाट्यामुळे तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत का? असा प्रश्न राज्यातील जनतेसमोर उभा राहिला आहे. हे सर्व सुरु असताना निवडणुकांच्या आधीच अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचारा सारखा गंभीर आरोप केला.

 

यामुळे देखील भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिला आहे. याचपार्श्वभूमिवर पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य महानगर पालिकांच्या निवडणुकीत महायुती एकत्र नसण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. काल 4 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांनी पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यात आणि केंद्रात सत्तेत असताना महानगर पालिकांच्या निवडणुकीत युती का तुटली यावरही भाष्य केलं. 

यावेळी अजित पवार म्हणाले की, "गेल्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणुका लढलो आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार केला. पण यावेळेसची निवडणूक वेगळी आहे. आम्ही केंद्र सरकारमध्ये एकत्र आहोत, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड चालू आहे. राज्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मी आणि आमचे सर्व सहकारी काम करत आहोत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील राजकारणाचे चित्र वेगळे पाहायला मिळत आहे. मात्र यादरम्यान गेल्याकाही महायुतीत सुरु असलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे मतदारांना प्रश्न पडला असेल की केंद्रात हे सोबत आहेत, राज्यात बरोबर आहेत, मग महानगपालिका निवडणुकांसाठी युती का नाही? मी आपल्याला स्पष्ट सांगतो, मागे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते, त्याआधी काँग्रेस राष्ट्रवादीचेही सरकार होते. केंद्रात युपीएच सरकार होतं. तिथे डॉक्टर मनमोहन सिंग होते. राज्यात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे मान्यवर होते. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही तिथले प्रश्न म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहत होतो. आज तोच प्रसंग आपल्या सर्वांच्या समोर आला आहे."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number