सोशल मीडियावरुन कोरोना ग्रस्तांची माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई

कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात एकूण १ ० रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ मुंबईत तर ८ जणं हे पुण्यात आढळले आहेत. या कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती सोशल मीडियावर उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा विभाीगीय आयुक्त असलेल्या डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात ४ हजारपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी […]

सोशल मीडियावरुन कोरोना ग्रस्तांची माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई

कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात एकूण १ ० रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ मुंबईत तर ८ जणं हे पुण्यात आढळले आहेत.

या कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती सोशल मीडियावर उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा विभाीगीय आयुक्त असलेल्या डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात ४ हजारपेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी पुण्यातून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला.

या रुग्णाची काही जणांनी ओळख उघड केली. यामुळे या कुटंबावर गावातल्या लोकांनी बहिष्कार घातला.

आम्हालाही हा आजार होईल, त्यामुळे तुम्ही गाव सोडून जा, असं म्हणून गावकऱ्यांनी या रुग्णाच्या घरावर बहिष्कार घातला. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाग्रस्तांची नावं उघड न करण्याबाबत आम्ही आवाहन करत आहोत. पण कोरोनाग्रस्तांची माहिती समाजमाध्यमातून खोडसाळपणा करत संभर्म निर्माण केल्यासंदर्भातील तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सायबर विभाग लक्ष ठेवून आहे. यासंपूर्ण संदर्भात अफवा पसरवत असताना आढळल्यास कारवाई करणार असल्याचं डॉ. म्हैसेकर यांनी सांगितलं.

दरम्यान चिकन खालल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, असा मेसेज सोशल मीडियावर पसरवण्यात आला होता.

या मेसेजमुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर टांगती तलवार आहे. अनेक व्यावसायिकांना कोटीच्या घरात आर्थिक नुकसानासा सामोरे जावे लागत आहे.

तसेच या कोरोना विषाणूचा फटका पोल्ट्री उद्योगासह पर्यटन तसेच इतर व्यावसायिकांनाही बसला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना व्हायरसमुळे बांगलादेश दौरा रद्द करावा लागला आहे. बांगलादेशमध्ये सुरु असलेली क्रिकेट लीग देखील रद्द करावी लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number