सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) संबंधित तीन प्रमुख नेते अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याबाबत मोठे विधान केले होते. एका पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना वांगचुक म्हणाले की, 'अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा नक्कीच आहेत. ते काही असे संत नाहीत, ज्यांना कशाचीच अपेक्षा नाही.
भविष्यात ते भ्रष्ट होणार नाहीत किंवा राजकीयदृष्ट्या स्वार्थी नसतील याची कोणतीही हमी देता येत नाही.' कारण मानवी स्वभावाबद्दल पूर्णपणे भाकीत करणे कठीण असते, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यादरम्यान त्यांनी वांगचुक यांच्या या विधानावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले आहे.
अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, "मला वाटतय तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही, ते म्हणतात की मी जेवढे पाहिले आणि जेवढे राजकीय नेते पहिले त्यापेक्षा ही मुलं खूप चांगली आहेत. त्यांच्यामध्ये अजून तरी मला काही वाटलं नाही, ते करप्शन करतील किंवा असं काही करतील तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण व्हिडिओमध्ये तेच म्हटले आहेत हे मुलं खूप चांगले आहेत शिकलेली आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघावा ते खूप साऱ्या गोष्ट बोलल्या आहेत. अविश्वास कुठे दाखवला मला तर खूप छान वाटलं, राजकारणात सध्या अपराधी बसले आहेत त्यापेक्षा ही मुलं चांगली आहेत. मी का वाटून घेऊ त्या गोष्टीचं."
पाच तारखेला दिल्लीत आंदोलन
विद्यार्थ्यांवर जगूने दाखल केले होते त्या मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत त्यामुळे आम्हाला नाही विलाजाने आंदोलन करावं लागतं. सरकार म्हणत होतो की कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही पण कोर्ट म्हणून आम्ही तयार आहोत तुम्ही फक्त लिस्ट द्या मात्र सरकार लिस्ट देत नाही देत नाही. जंतर-मंतरवर अगोदर जे आंदोलन झालं होतं त्यापेक्षा मोठा आंदोलन होणार आहे.
आदिवासी मुलं आंदोलनाला बसली आहेत देशातील असं एकही राज्य नाही की जिथे आंदोलन सुरू नाही. बॉम्बे हायकोर्टाचे टायपिंग फ्रेश रद्द झाली आहे, की बोर्ड मध्ये प्रॉब्लेम होता अजून काही अडचणी होत्या. परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात अशी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली आहे. यापुढे ज्या काही परीक्षा होतील ज्या सेंटरवर प्रॉब्लेम आले होते त्या सेंटरवर परीक्षा घेण्यात येऊ नये.