Viral Video : ‘हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल!’, आंदोलनकर्त्या महिलेच्या व्हायरल व्हिडीओवर संजय राऊतांची खास पोस्ट; म्हणाले ‘शोभतेस महाराष्ट्र कन्या…’

Viral Video : ‘हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल!’, आंदोलनकर्त्या महिलेच्या व्हायरल व्हिडीओवर संजय राऊतांची खास पोस्ट; म्हणाले ‘शोभतेस महाराष्ट्र कन्या…’

मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये काल आंदोलन पार पडले. दरम्यान, मुंबईतही अनेक नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली. परिणामी, नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. आंदोलनादरम्यान एका मुंबईकर महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेने केंद्रासह राज्यातील प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवरही त्यांनी बोट ठेवले आहे. या महिलेचा व्हिडीओ शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र कन्या शोभतेस, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महिलेला शाबासकी देत त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

हेही वाचा :  Sonam Wangchuk: ‘…तोपर्यंत माघार नाही’; पोलिसांच्या कारवाईनंतर सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version