Beed News : शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ, अवघ्या 15 मिनिटांत आंदोलन गुंडाळलं; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा उबाठा नेत्यावर घणाघात

बीड : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अर्धवट जलसंधारणाची कामं तातडीने पूर्ण करा, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला. माजी विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘बीडचा विकास तुमसे ना हो पायेगा’ या टॅगलाईनखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात […]

Beed News : शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ, अवघ्या 15 मिनिटांत आंदोलन गुंडाळलं; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा उबाठा नेत्यावर घणाघात

बीड : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अर्धवट जलसंधारणाची कामं तातडीने पूर्ण करा, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला. माजी विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘बीडचा विकास तुमसे ना हो पायेगा’ या टॅगलाईनखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र आता यावरूनच शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आंदोलन करण्यात आले. परंतु या आंदोलनाला अवघे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकरी तर फिरकलेच नाहीत. त्यामुळे आता आंदोलनदेखील तुमसे ना हो पायेगा, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. तसेच अवघ्या पंधरा मिनिटात आंदोलन गुंडाळून जाण्याची वेळ दानवे यांच्यावर आल्याची टीका देखील जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे.

हेही वाचा : DJ आणि डॉल्बीवर बंदी आणता येणार नाही, SP निखिल पिंगळेंचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय म्हणाले..

अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत तुमसे ना हो पयेगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीड जिल्हा काही लोकांमुळे बदनाम झालेला आहे. मोजक्या बोटावर मोजता येणाऱ्या लोकांमुळे हा जिल्हा बदनाम झालेला आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. ते बीडमध्ये जनआंदोलनात बोलत होते. या मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करा, ओला सुखा म्हणायची आवश्यकता नाही. शेतकऱ्याला आणि सर्वसामान्य नागरिकांचे हराम केलं आहे. या सरकारने याच्या विरोधात जिल्हा तालुका गाव पातळीवर आंदोलन शिवसेना करणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number