Amravati Municipal Election : अमरावतीत महायुतीला तडा ! जागावाटपावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

जागावाटपाचा तिढा न सुटल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची बोलणी फिस्कटली असून, आता हे दोन्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.<br/>
Amravati Municipal Election : अमरावतीत महायुतीला तडा ! जागावाटपावरून भाजप-शिवसेना आमनेसामने

Amravati Municipal Corporation Election : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अमरावतीतून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत सोबतीला असणारे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) अमरावतीत मात्र एकमेकांशी भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपाचा तिढा न सुटल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची बोलणी फिस्कटली असून, आता हे दोन्ही मित्रपक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजित पवारांच्या गोटात

25 जागांच्या मागणीवरून बिनसलं 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने अमरावतीत 25 जागांची मागणी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपने हा प्रस्ताव फेटाळून लावत केवळ 15 ते 16 जागा देण्याची तयारी दर्शवली. एकूण 87 जागांपैकी सन्मानजनक वाटा मिळत नसल्याने शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत शिंदेंची मोठी फिल्डिंग! 60 माजी नगरसेवकांचे तिकीट फायनल

मतांच्या विभाजनाचा धोका 

अमरावती महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच युती तुटल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा काँग्रेस किंवा एमआयएमला मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. भाजपचे वर्चस्व 2017 च्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत 45 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यावेळी इतर पक्षांची स्थिती खालीलप्रमाणे होती:

भाजप: 45 जागा (बहुमत)
काँग्रेस: 15 जागा
एमआयएम: 10 जागा
शिवसेना: 7 जागा
बसपा: 5 जागा
युवा स्वाभिमान (रवी राणा): 3 जागा

2017 मध्ये शिवसेनेची ताकद कमी होती, मात्र आता सत्ताधारी गट म्हणून त्यांनी अधिक जागांची मागणी लावून धरली होती.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version