Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? आज SC त महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदेंचे वकील कोर्टात बाजू मांडणार

नवी दिल्ली : देशभरात गणेशोत्सवाचा सण साजरा होत असतानाच राजकीय क्षेत्रात मात्र मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. आज, 15 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर असून एकनाथ शिंदेंच्या वतीने नीरज किशन कौल आज कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. तर […]

Shiv Sena Symbol Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? आज SC त महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदेंचे वकील कोर्टात बाजू मांडणार

नवी दिल्ली : देशभरात गणेशोत्सवाचा सण साजरा होत असतानाच राजकीय क्षेत्रात मात्र मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. आज, 15 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर असून एकनाथ शिंदेंच्या वतीने नीरज किशन कौल आज कोर्टात आपली बाजू मांडणार आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुरू असलेला युक्तिवाद संपला आहे. आज पुन्हा दुपारी दोन वाजल्यापासून या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्य कांत, जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. ऐन गणपती उत्सवाच्या काळात ही सुनावणी होत असून ठाकरे आणि शिंदेंमध्ये कोण बाजी मारेल, बाप्पा नेमका कोणाच्या बाजूने कौल देईल, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.   

मागील सुनावणीत बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेली पक्षघटना उद्धव ठाकरेंनी का चुकीच्या पद्धतीने बदलली, असा सवाल शिंदेंच्या वकिलांनी उपस्थित केला होता. अशातच आजपासून पुन्हा एकनाथ शिंदेंचा युक्तिवाद सुरू राहणार असून त्यानंतर सॉलिसिटर जनरल निवडणूक आयोग आणि अन्य घटनात्मक संस्थांची बाजू सर्वोच न्यायालयासमोर मांडतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आज न्यायालयात नेमकं काय घडतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

हेही वाचा : BIG BREAKING: आंदोलनासाठी मनोज जरांगे एकटेच निघणार! मुंबईत पोहोचल्यावर…; 18 व्या दिवशी नवं वळण?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number