मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात आज अंतरवाली सराटीमध्ये चर्चा पार पडली. जवळपास अडीच तास चाललेल्या या चर्चेत लाड यांनी जरांगेंच्या मागण्या ऐकून घेत या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिल आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात आज अंतरवाली सराटीत अत्यंत महत्वाची बैठक आणि चर्चा पार पडली. मराठा समाजाच्या मागण्याबाबत तब्बल अडीच तास लाड आणि जरांगे यांच्यात चर्चा झाली. जरांगे यांच्या पूर्ण मागण्या लाड यांनी ऐकून घेतल्या.दोघांच्याही देहबोलीवरून ही चर्चा सकारात्मक झाल्याचं दिसून आलं.
हेही वाचा- Dattatray Bharne: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपूर्वी होणार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची थेट घोषणा
मागण्या काय आहेत?
●हैद्राबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावे तसेच ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली त्यांना कास्ट व्हॅलीडिटी देण्यात यावे अशी मागणी केली.
●मराठा आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेण्यात यावे.
●मराठा आंदोलनात मयत झालेयांच्या कुटुंबियांना एमआयडीसी तसेच महावितरणमध्ये नोकरी देण्यात यावी.
●मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे.
●सातारा, औंध,पुणे संस्थानच्या गॅझेटियरचा जीआर काढण्यात यावा.
●मराठ्यांच्या सापडलेल्या 58 लाख नोंदी सार्वजनिक करा
●न्या.संदीप शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देऊन कुणबी नोंदी शोधायला लावा
●EWS मधून मराठा समाजाच्या विविध ठिकाणी नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्याची मागणी केलीय.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “या चर्चेदरम्यान तब्बल अडीच तास आमदार प्रसाद लाड यांनी मराठा समाजाचे प्रश्न आणि मागण्या जरांगे यांच्या कडून ऐकून घेतल्या तसेच या मागण्याबाबत आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असून भाऊ म्हणून जरांगे यांच्या मागण्या ऐकून घेतल्या.त्यामुळे जातीसाठी माती खायला देखील तयार असल्याचं सांगत 28 ते 29 तारखेपर्यंत या मागण्याबाबत जरांगे यांना माहिती दिली जाईल.वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा करणार असल्याचे लाड यांनी म्हटलंय. आतापर्यंत मराठा समाजाच्या मागण्याबाबत मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पावणे तीन वर्षात 8 उपोषण केलीयत. पण अनेक शिष्टमंडळ येऊनही जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे जरांगे यांनी अंतरवालीत 30 मे पासून 9 व्या उपोषणाचा ईशारा दिलाय.त्यामुळे 28 मे रोजीच आज अंतरवालीत जरांगे आणि लाड यांच्यात झालेल्या चर्चेला यश आलं की अपयश हे कळणार आहे. “
तसेच आमदार प्रसाद लाड म्हणाले की, “लाड यांच्याशी झालेल्या चर्चेतील मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला 28 मे पर्यंतची मुदत दिलीय. मागण्या पूर्ण न झाल्यास अंतरवालीतील उपोषणाचं स्वरुप बदलण्याचा ईशारा जरांगे यांनी दिलाय.”