कुठे मुसळधार पाऊस तर कुठे पाण्याची मारामार. अशी परिस्थिती असतानाच हेटवणे धरणामार्फत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला आहे. चिरनेर येथे ही घटना घडली.
नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला कंटेनर धडकला. चिरनेर येथे ही घटना घडली. पाण्याची ४० ते ५० फूट उंचच उंच फवारे उडाले. हेटवणे धरणातून आलेल्या पाईप लाईनला कंटेनर धडकला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या धरणातून नेरूळ, खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि एमआयडीसी मध्ये पाणी पुरवठा होतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.