Gold-Silver Price Today : लग्नसराईत सोनं-चांदी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर! दरात विक्रमी वाढ, 1.59 लाखांचा टप्पा ओलांडला

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यास सोने खरेदी स्वस्त होते; मात्र रुपया घसरल्याने भारताला सोने आयात करणे महाग पडत आहे. याशिवाय, सरकारने आयात शुल्क वाढवले आहे.
Gold-Silver Price Today : लग्नसराईत सोनं-चांदी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर! दरात विक्रमी वाढ, 1.59 लाखांचा टप्पा ओलांडला

Gold-Silver Price Today : लग्नाचा हंगाम आणि सण-उत्सवांमध्ये भारतात मौल्यवान धातूंच्या खरेदीला मोठी पसंती दिली जाते, परंतु सध्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. आज सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1.59 लाख रुपयांच्या पार गेला आहे. जर तुम्ही आज सराफा बाजारात जाण्याचा विचार करत असाल, तर घरून निघण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव तपासून घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशांतर्गत कर रचनेमुळे मौल्यवान धातूंचे दर गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यास सोने खरेदी स्वस्त होते; मात्र रुपया घसरल्याने भारताला सोने आयात करणे महाग पडत आहे. त्यातच देशातून डॉलरचा बाहेर जाणारा प्रवाह रोखण्यासाठी सरकारने सोने आयात शुल्क 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्के केल्याने ग्राहकांवरील भार अधिकच वाढला आहे. याशिवाय जगभरातील राजकीय अस्थिरता, आर्थिक अनिश्चितता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारातील पैसे काढून सोने-चांदीसारख्या 'सेफ हेवन' (सुरक्षित पर्याय) कडे वळत असल्याने मागणी आणि किमती दोन्ही वाढत आहेत.

प्रमुख शहरांतील आजचे दर
– मुंबई आणि पुणे: या दोन्ही शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,59,060 रुपये तर 22 कॅरेटसाठी 1,45,800 रुपये आहे. तसेच चांदीचा भाव 2,85,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
– दिल्ली : देशाच्या राजधानीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,59,210 रुपये आणि 22 कॅरेटचा भाव 1,45,950 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. येथील चांदीचा दरही 2,85,000 रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा – Petrol – Diesel Prices Hiked : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा धक्का! 12 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहराचे दर

खरेदी करताना बाजारातील रोजचे चढ-उतार जाणून घ्या
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या अनिश्चित वातावरणात सोने किंवा चांदी खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः लग्नसराईची खरेदी किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असताना, बाजारातील रोजचे चढ-उतार बारकाईने समजून घेतले पाहिजेत. ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणच्या दरांची तुलना करावी आणि दागिन्यांची शुद्धता (कॅरेट) तपासूनच अंतिम निर्णय घ्यावा, कारण पुढील काळातील भाव संपूर्णपणे जागतिक घडामोडींवर अवलंबून राहतील.

हेही वाचा – 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत OPS वर मोठी अपडेट

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version