पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करत दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने महिलेचे एक लाख ६५ हजारांचे दागिने लंपास केले. तळेगाव दाभाडे येथे बुधवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.