पुणे, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांची फसवूक करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी जामीन मंजूर केला. शैलजा दराडेंवर ४४ जणांची सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पुराव्यात छेडछाड करू नये तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये यासह विविध अटीशर्तींसह ७५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.