नाशिक, ५ मे २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय आप्पा करंजकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही तासातच प्रवेश होण्याची शक्यता आहे. विजय आप्पा करंजकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. शिउबाठातून उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज होते. त्यामुळे करंजकर हे पाऊल उचलणार असल्याची माहिती आहे. करंजकरांचा शिवसेनेत होणारा प्रवेश लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.