अमरावती, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र प्रकरणी दिलासा दिला आहे. नवनीत राणांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. याआधी मुंबईच्या उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अमरावती या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा नवनीत राणांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.