‘उपोषण सुरूच राहणार’

‘उपोषण सुरूच राहणार’

जालना, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल. या लाभार्थ्यांच्या सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा राज्य शासनाला दिला.

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेले आहे. ही घोषणा करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version