मुंबई, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव केला जाणार आहे. अलंकारांमध्ये प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठय़ा, सोन्याच्या साखळय़ा, हार यांचा समावेश आहे.
लिलाव सोमवार, २५ डिसेंबरला सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मंदिराच्या आवारात आयोजित केला जाणार आहे. लिलावादिवशी दागिने मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवले जाणार आहेत, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने देण्यात आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.