मुंबई, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते.
मनसे दुकानं आणि आस्थापनं यांनी मराठी नावाच्या पाट्या लावाव्यात यासाठी आंदोलन करत आहे. तसेच टोल संदर्भात मनसेचे आंदोलन सुरू आहे. याच दोन मुद्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून या भेटीची माहिती दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.