अमरावती, ०७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अमरावती शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सलग दोन दिवसांमध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच अनेकांचा अहवाल यायचा बाकी आहे. मागील नऊ महिन्यात जिल्ह्यात ५९१ डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तापाचे लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.