मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : उद्धव गटाकडून मुंबईत शिवडी कॉटनग्रीन मधील नागरिकांना गणेश पूजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे. उद्धव गटाच्या प्रभाग क्रमांक २०६ मार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना पूजेच्या साहित्याचे वाटप केले जाईल. याचा शुभारंभ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी स्थानिक शाखाप्रमुख बैजू हिंदोळे सुद्धा उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.