National Education Day 2025 : मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ का साजरा केला जातो?

देशभरात दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षण दिवस' साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात

National Education Day 2025 : मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ''राष्ट्रीय शिक्षण दिवस'' का साजरा केला जातो?

1 / 11

देशभरात दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी ''राष्ट्रीय शिक्षण दिवस'' साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात

2 / 11

''राष्ट्रीय शिक्षण दिवस'' साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि समाजात शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे

3 / 11

पण हा दिवस नेमका कधीपासून आणि का साजरा केला जाऊ लागला? चला तर जाणून घेऊया यामागील इतिहास

4 / 11

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ''राष्ट्रीय शिक्षण दिवस'' साजरा केला जातो

5 / 11

मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मौलाना अबुल कलाम मोहिउद्दीन अहमद असे होते

6 / 11

मौलाना आझाद हे 5 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 या कालावधीत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. ते महात्मा गांधींचे समर्थक मानले जात होते

7 / 11

या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारतातील शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले

8 / 11

त्यांच्या काळातच साहित्य अकादमी, ललित कला अकादमी आणि संगीत नाटक अकादमी यांची स्थापना झाली

9 / 11

मौलाना अबुल कलाम आझाद यांना 1992 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

10 / 11

देशासाठी मौलाना आझाद यांनी दिलेल्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने 11 सप्टेंबर 2008 रोजी त्यांच्या जयंतीला म्हणजेच 11 नोव्हेंबरला ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली

11 / 11
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number