Historical Places In India : भारतात ‘या’ ठिकाणी आहेत हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन इमारती

भारत आपल्या प्राचीन वारशासाठी आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी हजारो वर्षांनंतरही तितकीच भव्य आणि आकर्षक दिसतात

Historical Places In India : भारतात ''या'' ठिकाणी आहेत हजारो वर्षांपूर्वीच्या पुरातन इमारती

1 / 11

भारत आपल्या प्राचीन वारशासाठी आणि अप्रतिम वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी हजारो वर्षांनंतरही तितकीच भव्य आणि आकर्षक दिसतात. चला जाणून घेऊया भारतातील काही सर्वात जुनी आणि अद्वितीय ऐतिहासिक स्थळं

2 / 11

सांची स्तूप: तिसऱ्या शतकात बांधलेला सांची स्तूप हा बौद्ध धर्माचा अमूल्य वारसा आहे. सम्राट अशोकाने याची उभारणी केली होती. येथील शिल्पकला आणि शांततेचं वातावरण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं

3 / 11

महाबलीपुरम शोर मंदिर: तामिळनाडूमधील महाबलीपुरम येथील शोर मंदिर भगवान शिव आणि विष्णूला समर्पित आहे. पल्लव राजा राजसिंह, म्हणजेच नरसिंहवर्मन दुसरा यांनी आठव्या शतकात या मंदिराची उभारणी केली होती. समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर अप्रतिम दृश्य प्रदान करतं

4 / 11

कैलास मंदिर, वेरुळ (एलोरा): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ लेण्यांमधील कैलास मंदिर हे एकाच दगडातून कोरलेले जगप्रसिद्ध मंदिर आहे. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) यांनी 757 ते 783 इसवी सन दरम्यान हे भव्य मंदिर बांधले होते

5 / 11

खजुराहो मंदिर: मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर समूह आपल्या अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. 950 ते 1050 या काळात चंदेल राजवंशाने हे मंदिर उभारले. येथे कोरलेली शिल्पे भारतीय कलावैभवाची साक्ष देतात

6 / 11

बाराबार लेणी: सम्राट अशोकाने तपस्वींसाठी बांधलेल्या बाराबार लेण्या तिसऱ्या शतकातील आहेत. या लेण्यांतील दगडी बांधकाम आणि गुहेतील ध्वनिप्रणाली त्या काळातील वास्तुकलेचा चमत्कार दर्शवते

7 / 11

बृहदेश्वर मंदिर: तामिळनाडूमधील तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर चोल साम्राज्याचा अभिमान आहे. राजराज चोल प्रथम यांनी 1003 ते 1010 दरम्यान हे मंदिर बांधले. संपूर्ण ग्रॅनाइटमधून उभारलेले हे मंदिर सुमारे 200 फूट उंच असून, शिखरावर 80 टन वजनाचा एकाच दगडाचा घुमट आहे

8 / 11

लिंगराज मंदिर: ओडिशातील भुवनेश्वर येथे असलेले लिंगराज मंदिर 11 व्या शतकात बांधले गेले. हे भगवान शिवाला समर्पित असून, 180 फूट उंचीचे हे मंदिर त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचे उदाहरण आहे

9 / 11

सूर्य मंदिर, कोर्णाक: 1250 साली नरसिंह देव प्रथम यांनी सूर्य देवासाठी बांधलेले कोर्णाकचे सूर्य मंदिर सूर्याच्या विशाल रथाच्या आकारात तयार केले गेले आहे. मंदिराची कोरीव रचना आणि वैज्ञानिक दृष्टीने केलेली योजना पर्यटकांना थक्क करते

10 / 11

विरुपाक्ष मंदिर, हंपी: कर्नाटकातील हंपी येथे वसलेले विरुपाक्ष मंदिर सातव्या शतकातील अद्भुत रचना आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि आजही हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात

11 / 11
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number