नॅशनल क्रश रश्मिका-विजय यांचा विवाहसोहळा धूमधडाक्यात संपन्न, पाहा लग्नातील खास क्षण

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी पारंपारिक तेलुगू रितीरिवाजांनुसार उदयपूर येथील आयटीसी मोमेंटोसमध्ये विवाह झाला.

नॅशनल क्रश रश्मिका-विजय यांचा विवाहसोहळा धूमधडाक्यात संपन्न, पाहा लग्नातील खास क्षण

1 / 8

गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी पारंपारिक रितीरिवाजांनुसार उदयपूर येथील आयटीसी मोमेंटोसमध्ये विवाह झाला.

2 / 8

लग्नाच्या काही दिवस आधी विजय आणि रश्मिका दोघांनी सोशल मीडियावर ‘वेडिंग ऑफ VIROSH’ असं या लग्नाला नाव दिलं आहे. दरम्यान नुकतेच त्यांचे लग्नाचे सुंदर फोटो समोर आले आहेत.

3 / 8

यावेळी रश्मिकाने कोडावा रीतिरिवाजांनुसार सजवलेली लाल रंगाची पारंपारिक साडी नेसली, ज्यावर तिने गोल्डन दागिने परिधान केले आहेत. या वधू वेशात ती आणखीच मोहक आणि सुंदर दिसत आहे.

4 / 8

तर विजयने सफेद क्रिम रंगाचे धोतर नेसले आहे, तसेच लाल रंगाची शाल परिधान केली आहे. यावेळी त्याने देखील हाताची बोटे लाल केली आहेत. वर म्हणून या पारंपारिक वेशात विजय देवरकोंडा देखील खुप सुंदर दिसत आहे.

5 / 8

दोघांनी देखील सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी लग्नामधील काही मजेशीर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

6 / 8

सकाळी पार पडलेल्या पहिल्या विधीत पारंपरिक तेलुगू पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यानंतर संध्याकाळी दुसरा विवाह विधी कोडवा (कोडगु) परंपरेनुसार पार पडला आहे. कोडवा विवाह पद्धत ही कर्नाटकातील कोडगु प्रदेशाशी संबंधित असून, या विधींमध्ये पुरोहित नसतात.

7 / 8

रश्मिका आणि विजय यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीच घर करून बसली होती. दोघांच्याही लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

8 / 8
Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number