Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट! पोलीसांचा तत्काळ धावा, पण प्रकरण काहीतरी भलतंच निघालं;

मराठी नाट्यसृष्टीतील विनोदी अभिनेते विकास समुद्रे यांनी नुकतीच एक खळबळजनक फेसबुक पोस्ट केली. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून पोलिसांनी ताबडतोब या घटनेची नोंद घेतली.

Vikas Samudre Facebook Post: मराठी अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट! पोलीसांचा तत्काळ धावा, पण प्रकरण काहीतरी भलतंच निघालं;

मराठी नाट्यसृष्टीतील विनोदी अभिनेते विकास समुद्रे यांनी नुकतीच एक खळबळजनक फेसबुक पोस्ट केली. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून पोलिसांनी ताबडतोब या घटनेची नोंद घेतली. यात त्यांनी, मी आत्म्हत्या करणार अशी ओळ पोस्ट केली असून क्षणार्धात त्यांच्या चाहत्यांनी फेसबुक कमेंट्सद्वारे चिंता व्यक्त केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं असून त्यांनी लगेच या अभिनेत्याशी संपर्क साधला. मात्र ही घटना वेगळीच निघाली.

त्याच्या अशा पोस्ट्नंतर चाहत्यांनी कमेंट्समध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न केला, "अडचण असू शकते, पण हा मार्ग योग्य नाही, प्लीज असं काही करू नका…", अशी कमेंट एका युजरनं केलीय. तर, "सर, काय झालं? काही प्रॉब्लेम असेल तर, आपण काहीतरी मार्ग काढू शकतो… एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका…", अशी कमेंट आणखी एका युजरनं केलीय. सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनीही तातडीनं पावलं उललली आणि मुंबई पोलिसांनी त्वरित विकास समुद्रे याच्याशी संपर्क साधला. अभिनेता सुखरुप असून त्यानं आत्महत्या करण्याचा अजिबातच प्रयत्न न केल्याचं समोर आलंय.

हेही वाचा – Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणात मोठी घडामोड! "आदित्य ठाकरेंना आताच्या आता अटक करा" दिशाच्या वडिलांची CBIकडे मोठी मागणी

ही पोस्ट व्हायरल होताच, मुंबई पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी स्वतः मराठी अभिनेत्याशी संपर्क साधलेला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्ट अपलोड करताना अभिनेत्याकडून टायपिंग मिस्टेक झाल्याची बाब समोर आली. सध्या अभिनेता सुखरुप आणि सुरक्षित आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number