JD Vance On Immigration: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना पुन्हा एकदा आपल्या भूमिकेमुळे नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडियावर त्यांनी स्थलांतराविरोधी दृष्टिकोन मांडला. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगला तोंड द्याव लागलं. स्थलांतरावर बोलताना जेडी व्हान्स म्हणाले, “मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर अमेरिकन स्वप्नाची चोरी आहे आणि यामुळे स्थानिक अमेरिकन कामगारांकडून संधी हिरावल्या जात आहेत.” या विधानावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
पत्नी उषा व्हान्सवर प्रश्न
जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स या भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी जेडी व्हान्स यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला. काही युजर्सने म्हटले की, “आता तुम्ही तुमची भारतीय पत्नी आणि मुलांना भारतात परत पाठवणार का?” तर अनेकांनी हसत किंवा संताप व्यक्त करत म्हटले, “तुमची पत्नी आणि मुले अमेरिकन स्वप्न चोरत नाहीत का?”
हेही वाचा – India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार कधी अंतिम होणार? ट्रम्प टॅरिफबाबत मोठी अपडेट
पूर्वीच्या वादग्रस्त विधानांची आठवण
उपराष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जेडी व्हान्स अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते स्थलांतरविरोधी धोरण आणि अमेरिकन कामगारांच्या सुरक्षेबाबत नियमितपणे मते व्यक्त करत आहेत. या विधानामुळे त्यांच्या भूमिकेवर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
व्हान्स यांच्या विधानावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे आणि अनेकांनी त्यांना त्यांच्या पत्नीच्या भारतीय मूळाबाबत प्रश्न विचारले आहेत. काही युजर्सने त्यांना धर्म, कुटुंब आणि स्थलांतरविरोधी भूमिकेतील विरोधाभास लक्षात आणून दिला आहे. या प्रकारामुळे जेडी व्हान्स पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले असून, अमेरिकन स्थानिकांसह सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.