Ganeshotsav 2026 Police Security : मुंबई पोलीस अलर्ट! गणरायाच्या उत्सवाकरता सुरक्षेसाठी 17 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, 17,000 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सुरक्षा व्यवस्थेमध्ये किमान 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 37 पोलीस उपायुक्त (DCP) आणि 52 सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Ganeshotsav 2026 Police Security : मुंबई पोलीस अलर्ट! गणरायाच्या उत्सवाकरता सुरक्षेसाठी 17 हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई : गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, 17,000 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या सुरक्षा व्यवस्थेमध्ये किमान 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 37 पोलीस उपायुक्त (DCP) आणि 52 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, उत्सवाच्या कालावधीत सुमारे 2,650 पोलीस अधिकारी आणि 14,150 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली आहे. यात राज्य राखीव पोलीस दल (SRPF) च्या तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम्स (QRTs), दंगल नियंत्रण पथके आणि होम गार्ड्सचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने, मुंबई पोलिसांनी त्या दिवसासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्थाही आखली आहे. विसर्जन प्रक्रियेदरम्यान सुरक्षा आणि गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : Weather Update : बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाही बरसणार! पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोणते जिल्हे धोक्यात?

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः उत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी, शांत राहण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. उत्सव सुरळीतपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि सुरक्षेविषयक सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे. "पोलिसांची त्वरित मदत मिळवण्यासाठी नागरिक मुंबई पोलिसांच्या 100 किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात," असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईभर गणेशोत्सव 2026 सुरक्षित आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number