Local Train Update : 164 वर्षांची प्रतीक्षा संपणार ! आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा मुहूर्त ठरला

मध्य रेल्वेने या कामाला वेग दिला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल.<br/>
Local Train Update : 164 वर्षांची प्रतीक्षा संपणार ! आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचा मुहूर्त ठरला

Local Train Update : कल्याण पलीकडील उपनगरीय प्रवाशांच्या कष्टाचा प्रवास आता लवकरच सुखकर होणार आहे. आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मध्य रेल्वेने या कामाला वेग दिला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल.

164 वर्षांची प्रतीक्षा संपणार 

आसनगाव ते कसारा हा रेल्वे विभाग गेल्या 164 वर्षांपासून केवळ दोनच ट्रॅकवर अवलंबून आहे. सध्या याच दोन मार्गांवरून मुंबईतील उपनगरीय लोकल आणि देशाला जोडणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या धावतात. यामुळे ट्रॅकवर प्रचंड ताण निर्माण होतो आणि एका गाडीला मार्ग देण्यासाठी दुसरी गाडी थांबवावी लागते. 'मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट' (MUTP) अंतर्गत हा नवीन प्रकल्प राबवला जात असून, 2026 मध्ये याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

हेही वाचा – BMC Election : 'अभिषेक घोसाळकरांचा मरणोत्तर..' तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरमुळे दहिसरमध्ये वातावरण तापलं

प्रकल्पाचे स्वरूप आणि फायदे

कल्याण ते कसारा हे एकूण 67 किमीचे अंतर असून त्यातील आसनगाव ते कसारा हा 35 किमीचा पट्टा या तिसऱ्या मार्गिकेमुळे अधिक सक्षम होईल. ही तिसरी लाईन प्रामुख्याने उपनगरीय लोकलसाठी वापरली जाणार आहे. टिटवाळा, आसनगाव आणि कसारा भागातील प्रवाशांना यामुळे अतिरिक्त लोकल गाड्यांची सुविधा मिळेल. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या अडथळ्याविना लोकल चालवता येतील, ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

हेही वाचा – Pune Seat Sharing Dispute : पुण्यातील जागावाटपावरून शिवसैनिक खवळले, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा संताप

प्रकल्पाचा प्रवास

दरम्यान, 2011 मध्ये रेल्वे अर्थसंकल्पात या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाली. 2016 मध्ये प्रत्यक्ष जमिनीवरील कामाला सुरुवात झाली. तथापी, 2025-26 मध्ये बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून 2026 मध्ये प्रत्यक्ष वाहतूक सुरू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे कसारा रेल्वे स्थानकावर अतिरिक्त गाड्या चालवण्याची क्षमता वाढणार आहे, जे मुंबईच्या वाढत्या उपनगरीय विस्तारासाठी अत्यंत आवश्यक आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version