Mumbai Metro 3 Halted : गर्दीच्या वेळी दरवाज्यांनी दिला दगा, प्रवाशांना मनस्ताप; नेमकं काय घडलं?

सकाळी 10.25 मिनिटांनी मेट्रो बंद पडली होती. वरळी येथील आचार्य अत्रे चौक स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवण्यात आले. या बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
Mumbai Metro 3 Halted : गर्दीच्या वेळी दरवाज्यांनी दिला दगा, प्रवाशांना मनस्ताप; नेमकं काय घडलं?

Mumbai Metro 3 Halted : मुंबईकरांच्या प्रवासासाठी महत्त्वाची ठरलेली शहरातील पहिली भुयारी मेट्रो (Underground Metro) अर्थात 'मुंबई मेट्रो 3' (Mumbai Metro 3) आज सकाळी अचानक ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे (Technical Snag) ही मेट्रो बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ऐन गर्दीच्या वेळेत आणि ऑफिसच्या वेळेत मेट्रो सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.25 मिनिटांनी मेट्रो बंद पडली होती. वरळी (Worli) येथील आचार्य अत्रे चौक (Acharya Atre Chowk) स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मेट्रोतून खाली उतरवण्यात आले. ही मेट्रो 'आरे' (Aarey) ते 'कफ परेड' (Cuffe Parade) दरम्यान धावत होती. 'सिद्धिविनायक' (Siddhivinayak) स्थानकात पोहोचताच मेट्रोचे दरवाजे उघडलेच नाहीत, ज्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय झाली. बराच वेळ दरवाजे न उघडल्याने आतच अडकल्यानंतर अखेरीस दरवाजे उघडले. त्यानंतर ही मेट्रो 'वरळी' स्थानकावर आली आणि तेथे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

हेही वाचा – Soak Ecstasy of Enlightenment Program : पुढच्या महिन्यात सद्गगुरु मुंबईत; ईशा फाउंडेशनच्या वतीने 'एक्स्टसी ऑफ एनलाईटनमेंट' कार्यक्रम आयोजित

सेवा विलंबाने सुरू
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो ठप्प झाल्याची माहिती मिळताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते, अशी माहिती मुंबई मेट्रोकडून देण्यात आली आहे. तांत्रिक समस्या दूर करण्यात आली आहे, पण सध्या मेट्रो 3 विलंबाने (Metro 3 Delayed) धावत आहे, असे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मेट्रो सेवा पूर्ववत झाली असली तरी प्रवाशांना उशीर होत आहे.

हेही वाचा – Mulund Traffic Update : मुलुंडकरांना मोठा दिलासा! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version