सध्या राज्यात अनेक सण-समारंभाची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान प्रसाद, मिठाई, नैवेद्य मोठ्या प्रमाणात बनवला जातो व खरेदी सुद्धा केला जातो. परंतु आता सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन सणासुदीत कात्री बसणार आहे. सणासुदीच्या दिवसात मिठाई महागली आहे. मिठाईच्या दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कारण दूध, तूप, साखर, बेसन, काजू, बदाम ,पिस्त्यांसह सुका मेवा यासर्वांचे दर वाढले आहेत. याबरोबरच इंधन, वाहतूक, कामगारांची मजदूरी, पॅकिंग साहित्य यांची सुद्धा किंमत वाढलेलली आहे. त्यामुळे या सर्वांचा परिणाम मिठाईवर होत आहे.
सर्वसामान्यांना या महागाईचा सामना करत सण-समारंभ साजरे करावे लागणार आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असून दरवाढ कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.