BMC Opposition Leader : महापालिकेत महिलाराज! माजी महापौर किशोरी पेडणेकर बनणार विरोधी पक्षनेत्या; आज होणार अधिकृत घोषणा

मुंबई महापालिकेत आज, सोमवारी दुसरी महत्त्वाची विशेष सभा पार पडणार आहे.

BMC Opposition Leader : महापालिकेत महिलाराज! माजी महापौर किशोरी पेडणेकर बनणार विरोधी पक्षनेत्या; आज होणार अधिकृत घोषणा

मुंबई : मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर आज, सोमवारी महापालिकेत दुसरी महत्त्वाची विशेष सभा पार पडणार आहे. या सभेत सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच विविध वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावेही जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेवर यंदा महिलाराज पाहायला मिळणार असून महापौरपदी रितू तावडे यांची नियुक्ती झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदही महिलेकडेच जाणार असल्याचे समजते. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका किशोर पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोध पक्षनेत्या म्हणून होणार असल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षनेते पद 2000 पासून अस्तित्वात आले असून गेल्या 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होणार आहे. आत्तापर्यंत काँग्रेसकडे असणारे विरोधी पक्ष नेत्याचे पद प्रथमच शिवसेनेकडे जाणार आहे. तर सभागृह नेतेपदी गणेश खनकर यांची वर्णी लागण्याची शक्यत आहे.

हेही वाचा : Rajpal Yadav: राजपाल यादव यांच्या तुरुंगातील सुटकेच्या चर्चांमागचं खरं सत्य काय? पत्नी राधा यादव यांचा मोठा खुलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number