मुंबई : प्रसिद्ध चित्रकार अब्दुल अझीझ रायबा म्हणजेच ए.ए. रायबा यांच्या जीवन आणि कलेवर आधारित असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशिक करण्यात आलेलं आहे. 'अब्दुल अझीझ रायबा' या नावाचं हे पुस्तक ललित कला अकादमीने प्रकाशित केलेलं आहे. खरं तर रायबा हे भारतीय आधुनिक चित्रकलेतील अतिशय प्रसिद्ध असलेलं नाव होतं. त्यांच्या वेगळ्या चित्रशैलीमुळे त्यांची खास ओळख ही निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्यांना 'नॅशनल अवॉर्ड शिवाय 'बॉम्बे आर्ट सोसायटी सुवर्णपदक'असे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.
या पुस्तकाच लेखन हे ज्येष्ठ लेखक आणि कला अभ्यासक श्रीराम गोपाळ खाडिलकर यांनी केलेलं आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या कला क्षेत्राशी जोडलेले आहेत. या खास पुस्तकासाठी खाडिलकर यांनी साधारण चार वर्षांपूर्वी रायबा यांच्याशी संबंधित असलेली माहिती आणि काही जुने फोटो हे ललित कला अकादमीकडे दिले होते. त्यानंतरच अनेक वर्ष गेल्याने हे पुस्तक कधी प्रकाशित होईल, याची ही त्यांनी कल्पना केली नव्हती. मात्र, अचानकच पुस्तकाची छापील प्रत हातात आल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला. या पुस्तकाच्या प्रकाशनाचं सर्व श्रेय हे त्यांनी ललित कला अकादमीचे चेअरमन उत्तम पाचरणे यांना दिलं आहे.
श्रीराम गोपाळ यांनी म्हटले की, चार वर्षांपूर्वी माहिती तसेच फोटो दिले होते. त्यानंतर हे पुस्तक जवळपास मी विसरुनच गेलो होतो. पण आता अचानक हे पुस्तक हातात आलं आणि खूप आनंद झाला. खरं तर आज रायबा असते, तर हे सुंदर पुस्त पाहून त्यांनाही नक्कीच फार आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली.