Mumbai Raja Ganesh Galli 2026: मुंबईच्या राजाची पहिली झलक! बाप्पाचे रूप पाहून थक्क व्हाल

मुंबईतील गणेशभक्तांसह वरुणराजाही सकाळपासून बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाची भाविकांना विशेष उत्सुकता

Mumbai Raja Ganesh Galli 2026: मुंबईच्या राजाची पहिली झलक! बाप्पाचे रूप पाहून थक्क व्हाल

मुंबईतील गणेशभक्तांसह वरुणराजाही सकाळपासून बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या राजाच्या दर्शनाची भाविकांना विशेष उत्सुकता असते. यंदाच्या राजाची मूर्ती आणि सजावट कोणत्या संकल्पनेवर आधारित असेल, याकडे गणेशभक्तांचे लक्ष लागले होते. लालबाग परिसरातील गणेश गल्लीतील गणरायाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला असून, यावेळी भाविकांना बाप्पाची पहिली झलक पाहायला मिळाली. गणेश गल्लीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या बाप्पाचे मनमोहक रूप भाविकांसमोर प्रदर्शित झाले आहे.

यंदाची सजावट आणि बाप्पाचे रूप अत्यंत विलोभनीय व आकर्षक आहे. खाली हाताभोवती असलेले टाळ हे विठ्ठलाच्या वारीचे प्रतीक मानले जात असून, बाप्पाच्या एका हातात मोरपंखही पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे, बाप्पाची सुबक मूर्ती एका अष्टराच्या फुलावर विराजमान असून, एका पायावर तोल सांभाळताना दिसत आहे. बाप्पाच्या हातांमध्ये शंख तसेच चांदीचा कडाही पाहायला मिळत आहे. या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – Lalbaugcha Raja 2026 : बहुप्रतीक्षित लालबागचा राजा 2026 चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

प्रथम दर्शन सोहळ्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती करण्यात आली. मुंबईच्या राजाचे यंदाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number