Mumbai Monorail Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एका वर्षानंतर पुन्हा धावणार मोनोरेल, पण दिवाळीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई: चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान धावणारी मोनोरेल सेवा गेल्या एक वर्षापासून बंद आहे. सातत्याने होणारे बिघाड आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून MMRDA ने 20 सप्टेंबर 2025 पासून

Mumbai Monorail Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! एका वर्षानंतर पुन्हा धावणार मोनोरेल, पण दिवाळीपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

मुंबई: चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान धावणारी मोनोरेल सेवा गेल्या एक वर्षापासून बंद आहे. सातत्याने होणारे बिघाड आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून MMRDA ने 20 सप्टेंबर 2025 पासून ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली होती. दरम्यान, मोनोरेलचे अत्याधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून मार्गिकेला सुरक्षा प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. मात्र, उन्नत मार्गिकेमधील दोन ट्रॅकमध्ये मोठी मोकळी जागा असल्याने भविष्यातील धोका टाळण्यासाठी त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घेतला आहे.

मोनोरेल ही उन्नत मार्गिकेवरून धावते आणि या दोन्ही मार्गिकांमध्ये मोठी मोकळी जागा आहे. धावत्या मोनोरेलमधून उंचावरून काही वस्तू पडल्यास किंवा गाडीचा कोणताही भाग खाली पडल्यास रस्त्यावरील वाहनांना आणि पादचाऱ्यांना गंभीर इजा होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर MMRDA ने सुरक्षिततेची पुन्हा तपासणी केली. ही तपासणी पूर्ण झाली असून मोकळ्या जागेत सुरक्षा जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असून दिवाळीच्या सुमारास मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होणार आहे.

हेही वाचा – Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; पर्यूषण काळात भाजप आमदाराच्या शाळेत कांदा-लसूणला मनाई

मोनोरेल बंद असण्याची इतर कारणे –
देशातील पहिली आणि एकमेव असलेली ही मार्गिका सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. सुरुवातीला प्रवासी कमी असल्याने तोट्याची टीका झाली, तर नंतर वारंवार अपघात आणि तांत्रिक बिघाडांमुळे चर्चेत आली. याआधी आगीमुळे तब्बल 9 महिने सेवा बंद होती. 2025 मध्ये अतिभारामुळे दोन गाड्या एका बाजूला झुकल्याने दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढावे लागले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number