मुंबई : गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या दोन्ही मार्गिकांवर २० फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर सेवेच्या कालावधीत ३० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११ वाजता बंद होणारी मेट्रो सेवा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० वाजता बंद होणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा यासाठी मेट्रो व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.