Mumbai Bridge Closure : गणेशोत्सवात कोणते चार पादचारी पूल बंद असणार? जाणून घ्या…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून, मशीद आणि माटुंगा रेल्वे स्थानकांवरील 4 पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेला BMC कडून याबाबत सूचना मिळाली अ

Mumbai Bridge Closure : गणेशोत्सवात कोणते चार पादचारी पूल बंद असणार? जाणून घ्या…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून, मशीद आणि माटुंगा रेल्वे स्थानकांवरील 4 पादचारी पूल बंद करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेला BMC कडून याबाबत सूचना मिळाली असून IIT मुंबईने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 27 August 2026 रोजी BMC आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी या पुलांची एकत्रित पाहणी केली होती. त्यानंतर 31 August 2026 रोजी IIT मुंबईने या चारही पुलांचे स्वतंत्र तपासणी अहवाल सादर केले आहेत.

तपासणीच्या निष्कर्षानुसार हे चारही पूल धोकादायक आणि असुरक्षित स्थितीत असल्याचे समोर आले आहे. पुलांच्या मुख्य भागांची झीज झाली असून गंज लागला आहे. त्यामुळे हा अहवालात हे पूल तात्काळ पादचाऱ्यांसाठी बंद करावेत आणि ते पाडून (dismantle) नव्याने बांधावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. IIT मुंबईच्या अहवालात सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन BMC ने रेल्वे प्रशासनाला हे चारही पूल त्वरित बंद करण्याची आणि पुढील सूचना मिळेपर्यंत या पुलांवर कोणालाही जाऊ न देण्याची विनंती केली आहे.
  
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असलेले 4 पूल खालीलप्रमाणे आहेत:

1. मशीद येथील भांडारी पादचारी पूल – किमी 0/4-6
2. मशीद रेल्वे स्थानक पादचारी पूल – किमी 1/2-3
3.भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल – किमी 10/22-23
4. गुरु नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल – किमी 11/14-15

गणेशोत्सव काळात प्रवासी आणि पादचाऱ्यांची मोठी गर्दी होणार, असल्याने हे पूल बंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्सवादरम्यान स्टेशन परिसरात प्रचंड गर्दी होणे अपेक्षित आहे, त्यामुळे कोणताही अघटित प्रकार घडू नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे धोकादायक ठरलेले पूल वापरण्यास बंदी घालणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांना आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number