Tejas Crash: दुबई एअर शो 2025 दरम्यान भारतीय एचएएलचे लढाऊ विमान तेजस प्रात्यक्षिकादरम्यान कोसळले. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी 2:10 वाजता विमान जमिनीवर कोसळले. अपघातानंतर विमानतळाजवळ काळा धूर पसरला आणि महिला व मुले यासह प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्त विमानातील पायलटचा मृत्यू झाला आहे.
तथापि, संरक्षण सूत्रांनी सांगितले की पायलटाच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्याचं काम सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार आदित्य कौर यांनी या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो प्रेक्षकांसाठी आणि विमानप्रेमींना धक्का देणारा आहे. भारतीय हवाई दलाने देखील दुबई एअर शो दरम्यान तेजस विमान कोसळल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
Indian Air Force LCA Tejas has crashed during the Dubai air show. Fate of the pilot is being ascertained: Defence sources pic.twitter.com/Ui1tkzjg6H — ANI (@ANI) November 21, 2025
हेही वाचा – Ghaziabad Transport Hub: देशातील सर्वात आधुनिक बस टर्मिनल गाझियाबादमध्ये; विमानतळासारख्या मिळणार सुविधा
दरम्यान, अपघातानंतर आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली असून घटनास्थळावरील गर्दी हटवण्यात आली आहे. सध्या अपघाताचे कारण समजून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. अधिकृत माहिती येताच ताबडतोब जाहीर केली जाईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.