घरगुती विनाअनुदानित गॅसच्या 62.50 रुपयांनी कपात झाली असल्यामुळे सामन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्यामुळे देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात कपात झाली आहे.त्यामुळे आता गॅसचा दर 574 रुपये असणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली असून देशात गॅसच्या दरात कपात झाली आहे.
घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात 62.50 रुपयांनी कपात झाली आहे.
गेल्या महिन्यात सरकारने गॅसच्या दरात 100.50 रुपयांनी कपात केली होती.
आता पुन्हा 62.50 रुपायांची कपात केल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यामुळे ग्राहकाला बॅंक खात्यात 142 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.